Marathi Jokes | भन्नाट मराठी जोक्स, मराठी विनोद

Marathi Jokes | भन्नाट मराठी जोक्स, मराठी विनोद.

नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी जोक्स या विषयावर एक छानशी पोस्ट लिहिलेली आहे आमची अशी आशा आहे की तुम्हालाही पोस्ट नक्कीच आवडेल आवडल्यास ती तुम्ही कमेंट करून किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करूनही सांगू शकता व न आवडल्यासही तुम्ही आम्हाला संपर्क साधून आपल्यास काय चुकीचे वाटले किंवा अधिक काय गोष्टी आपण यात ऍड केल्या पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगू शकता आता खरं सांगायचं म्हटलं तर जोक ही एक देवाने दिलेली देणगी आहे जेणेकरून आपण हसतो आणि हसल्यामुळे आपण आनंदी राहतो आता आनंदी का राहायचे आपल्याकडे एकच आयुष्य आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण आनंदीच राहिले पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये कायम हसत खेळत राहिलं पाहिजे म्हणजेच आपले आयुष्य आपण हसत खेळत पार पाडलं पाहिजे आयुष्याच्या या प्रवासात हसणं एक खूप खूप मोठी भूमिका बजावते तर ते कसं आता आपण जोक्स वाचल्यानंतर हसतो व हसल्याने आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो व आपलं शरीर तंदुरुस्त राहतो. कलिका लेखकाने लिहिलेले आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये हसलो नाही तर म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आपण एकही दिवस हसलो नाही तर आपला आयुष्य आपल्या आयुष्यातला तो दिवस वाया गेला असे आपण समजून घ्यावे तर बघूया खालील जोक्स आमची अशी आशा आहे की तुम्ही हे जोक्स ऐकून नक्कीच हसतात म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हसू हे खूप महत्त्वाचं असतं माणसाने कायम हसत राहिले पाहिजे आणि याच हसण्याचं कारण आम्ही बनण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी ही पोस्ट घेऊन आलो आहोत ज्यामध्ये आम्ही खूप मस्त मस्त मराठी जोक तुमच्यासाठी सादर केले आहेत तर ते तुम्हाला आवडतील अशी आशा करतो.


Marathi Jokes



​एस टि स्टॅन्ड वर पुण्याची मुलगी

आपल्या काॅलेज स्टाईल मध्ये तुच्छतेने बस कंडक्टरला विचारते,

“हे डबडं केव्हा हलणार इथून? ”

कंडक्टर: “कचरा भरल्यानंतर लगेच!”

कारण कंडक्टर सोलापूरचा होता.


​BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..

GF: अय्यां… खरंच.. का रे?

BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे.


मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने

मच्छर खाल्ले,

बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस

डॉक्टरला बोलाव,

मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण

नाही बाईसाहेब..

मी त्याला All Out पाजले आहे.


​दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं…

त्या मुली पण “परी हु मै” गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात,

कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच..


सासू: “कित्ती वेळा सांगितलंय

बाहेर जातांना टिकली लावत जा”

सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर

कुणी टिकली नाही लावत”

सासू: “अगं जीन्सवर नाही,

कपाळावर लाव, भवाने !”


तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल,

तर अविवाहित असतांना बदला.

लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण

बदलू शकत नाही.


डबल मीनिंग जोक्स मराठी


गणपतीला दोन बायका असतात,

रिद्धी आणि सिद्धी.

सामान्य माणसाला एकच बायको असते,

ती पण जिद्दी.


शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन.

पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा.

मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो.


मुलगा: तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील,

की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील ?

मुलगी: तुटलेल्या चपलेने मार खाशील,

की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील ?


एकदा तरूण मुलांचा ग्रुप दिंडीला निघतो,

गूरूजी कानमंत्र सांगतात ?

रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली

तर फक्त हरि ओम ! म्हणायचं.

म्हणजे लक्ष विचलित होणार नाही.

थोडे अंतर चालल्यावर एक जन

!! हरि ओम !! म्हणतो..

लगेच बाकी सारे एका सूरात

म्हणतात ?

कुठंय कुठंय !


एक मुलगा देवाला विचारतो,

“तिला गुलाबाचं फूल का आवडतं ?

ते तर एका दिवसात मरून जातं !

मग तिला मी का आवडत नाही ?

मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो”!

देव उत्तर देतात,

भारी रे !

एक नंबर !

Whatsapp वर टाक !


आजचा उपदेश:

जर कोणी आपल्याला पाहुन

दरवाजा बंद केला तर,

आपण पण त्याला दाखवुन द्यायचे,

की दरवाज्याला दोन

कड्या असतात.


Marathi Jokes


तिचा फोन आला,

खुप अकडुन ती म्हणाली,

विसरुन जा मला.

मी म्हणालो,

आधी नाव तरी सांग कोण आहेस तु?


नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?

बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल

तु खुश मी पण खुश.

नवरा: २० रुपयांची लागली आहे,

हे घे १० रूपये आणि चल निघ.


मुलगी: नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा.

मुलगा: ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा कितवा?


लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे?

लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला

‘खाऊ’ बोलणारी मुले,

मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात.


गुरुजी: बंडू खरं-खरं सांग नाहीतर,

चड्डी काढून मारेन तुला.

बंडू: पण सगळी चूक माझी आहे,

तुम्ही का चड्डी काढताय ?


Husband Wife Jokes in Marathi


बंडया: बाबा मला Blackberry किंवा Apple पाहिजे,

बाबा: कारट्या तो फणस आणलाय तो संपव आधी.


बँक मधून मुलीला फोन आला,

तुम्हाला Credit Card पाहीजे का?

मुलगी: नको माझ्याकडे Boyfriend आहे.


सरदार: डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,

झोपून उठल्यावर झोप येत नाही,

काय करू?

डॉक्टर: रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल.


चिंटुः आई परी आकाशात उडते का गं?

आईः हो..

चिंटु: मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात?

आईः अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का?

चिंटुः पण बाबा तिला तर परी म्हणतात,

आईः हो का! मग उद्या उडेल ती बघच तु !


बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे,

कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.

नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना!


बायको: माझी मैत्रीण येणार आहे,

दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..

नवरा: बरं.. पण वचन दे,

माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील!


एका मुलीने,

आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंट केला,

आपलं लग्न होवू शकत नाही कारण माझं

लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले आहे..

मुलगा मॅसेज वाचुन खुप

दुःखी होतो आणि रडायला लागतो..

२ मिनिटांनंतर त्या मुलाला मॅसेज येतो,

सॅारी, सॅारी!

चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला !


हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर

तुमचे पैसे वाचू शकतील..

फक्त तिला म्हणा कि,

बोल जाडे! आज काय खाणार?


नवरा बायकोचं भांडण चालु असतं.

नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर

माझ्या मधला जनावर बाहेर येईल

बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय!


एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते.

आणि ३ दिवसांनी परत घरी येते,

वडील (रागाने): आता काय हवंय?

मुलगी: बारीक पिनचा चार्जर !


Dirty Jokes in Marathi


वडील: अरे, एक काळ असा होता,

की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव

आणि अंडी घेऊन यायचो.

मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा!

आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !


टिचर: बंडया तु वर्गात

सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?

बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला

“Whatsapp” परवडत नाही.


बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता,

तेव्हा मला ‘परी’ म्हणता..

बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता..

मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात.

नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय,

“सिधी बात नो बकवास”


मराठी जोक्स


आई : इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतास?

गंपू: पिक्चर बघायला गेलो होतो,

आई: कोणता?

गंपू: माँ की ममता.

आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ,

गंपू: कोणता?

आई: बाप का कहर.


एक मध्यम वयाचा माणूस जिम मध्ये

जातो आणि तिथल्या ट्रेनर ला विचारतो,

माणूस: मला एका सुंदर मुलीला पटवायचे आहे

तर, मी कोणती मशीन वापरू?

ट्रेनर: सर तुम्ही ए.टी.एम. मशिनच वापरा !


ट्रेन मध्ये बसलेल्या कुलकर्णी बाई

त्यांच्या लहान मुलाला सारखे सारखे सांगत होती

सोन्या खा लवकर, लवकर नाहीतर,

हा गाजराचा हलवा त्या काकांना देऊन टाकेन.

शेवटी समोर बसलेले जोशी काका वैतागून म्हणाले,

ओ वाहिनी काय करायचं ते लवकर ठरवा,

तुमच्या हलव्याच्या नादात मी चार स्टेशन पुढे आलोय!


पोलिस : सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड.

चालक : तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड.

पोलिस : ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.


बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,

आज रात्री मी पूरी करणार आहे..

नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.

लागला ना डोक्याला शॉट,

वाचा नीट परत एकदा.

 

बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता.

गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..

कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा.


तो तिला म्हणाला,

जीना सिर्फ मेरे लिए!

ती म्हणाली,

“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,

तू ये जिन्याने !”


non veg jokes marathi

 

योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.

मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?

योगेश : ते नंतर, आधी पोहे, चहा

आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.

मग बसू !


चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?

झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.

चिंगी: कितीजण होते धावायला?

झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !


funny jokes in marathi
 

नवरा : अगं, ऐकलस का,

छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज

मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय.

बायको : चड्डी काढून दाखवली असती तर,

अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं..


double meaning jokes in marathi

 

सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,

कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका

आत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन

उगाचच 5 किलोमीटर जाऊन आला !


मुलगी: माझे हृदय म्हणजे माझा

मोबाईल आहे आणि तू त्यातले

सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस..

मुलगा: राणी एक विचारू ?

मुलगी: हो विचार ना..

मुलगा: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना ?


hey google tell me a joke in marathi

 

लहान मुलगा : आज्जी नमस्कार करतो.

पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.

आज्जी : आशीर्वाद सावकाश पळ रे बाबा !


जो नेहमी हसत असतो त्याला

HAS MUKH म्हणतात.

आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला

HUS BAND म्हणतात.


आई: बेटा तू केस का कापत नाही?

मुलगा: फॅशन आहे आई

आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय

लहान मुलगी पसंद आहे म्हणून,

आता जा नांदायला.


एक मैत्रीण :- तु खुप बोर झाल्यावर काय करतेस ?

दुसरी :- मस्तपैकी मॉलमध्ये जाते,

मन भरेपर्यंत शॉपिंग करते,

आणि ट्रॉली काऊंटरलाच सोडून घरी येते.


jokes in marathi

 

एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,

तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,

बायको: काय आहे?

नवरा: या २ वायरांपैकी एक जरा धर,

बायको: हं धरली,

नवरा: काही जाणवलं का?

बायको: नाही,

नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या

वायरमध्ये आहे तर !


काही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस

My dad is my real hero

मग आमच म्हातार काय

नीळू फुले आहे का.


Non Veg Jokes Marathi


एक महिला डॉक्टरांना: यांना ठिक करा हो,

हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात,

डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे,

तुम्ही फार लकी आहात,

स्त्री: कसली लकी,

उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून !


अगर कभी टूट कर बिखर जाओ तो मुझे याद

कर लेना .

क्यों की मेरे पास रुपये 5/-

वाला fevi-quick बेकार पड़ा है.


बायको: अहो एक सांगू का,

पण मारणार तर नाही ना?

नवरा: हो सांग ना,

बायको: मी गरोदर आहे,

नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे,

मग तू एवढी घाबरतेस का?

बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती,

तेव्हा त्यांनी मारलं होतं !


जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?

नेने : हो, पण पैसे पडतील

जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी.


पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना

पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत

पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण

आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय?


नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.

बायको: एकटीच आली असेल?

नवरा: हो तुला कसं माहीत?

बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता.


पुण्यातल्या एका फ्री वायफाय नेटवर्कचा पासवर्ड,

घे भिकारड्या.


सासू: कित्ती वेळा सांगितलंय

बाहेर जातांना टिकली लावत जा

सूनबाई: अहो सासूबाई, जीन्सवर

कुणी टिकली नाही लावत

सासू: अगं जीन्सवर नाही,

कपाळावर लाव, भवाने !


भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना

पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?

भिकारी : हा आहे साहेब

पुणेकर : आधी ते खर्च कर.


नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे,

बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न.

मला कशाला गटवलीत?

नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा.


Funny Jokes in Marathi


पुणेकर : काका पावशेर रताळे द्या

दुकानदार : पिशवीत देऊ?

पुणेकर : नाही नाही, पेन ड्राईव्ह आणलाय.

त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात.


Marathi Jokes SMS


भारतात बिस्कीट उत्पादन करणाऱ्या,

दोन प्रसिद्ध कंपन्या:

१) मारी गोल्ड २) पारले जी,

एक कपात जात नाही,

दुसरा कपात गेला की परत येत नाही.


Double Meaning Jokes in Marathi


३ मुंग्यांना १ केक दिसतो.

पहिली जाते आणि केक खाते.

दुसरी पण जाऊन खाते.

तिसरी नाही खात का ?

ती म्हणते: शिईईईई.

केक ला मुंग्या लागल्यात!


Marathi Chavat Jokes


मुलगी ( Customer Care ला ): मला १ मेसेज,

१५ जणांना पाठवायचा आहे, कसा करू?

Customer Care: मेसेज काय आहे?

मुलगी: हाय जानू, काय करतोयस?

माझा रिचार्ज संपलाय १०० चा रिचार्ज कर ना.


Comedy Jokes Marathi


ट्रेन मध्ये गावाकडील बाई लहान

बाळाचे लंगोट बदलत असते.

शहरी बाई: हग्गीस नाही का?

गावाकडील बाई: नाही, फक्त मूतीस.


Navra Bayko Jokes Marathi


डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?

नवरा: बरं वाटतंय तिला आता,

आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय.


Marathi Jokes for Kids


नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात

एक सुंदर मुलगी आली होती.

बायको: एकटीच आली असेल?

नवरा: हो तुला कसं माहीत?

बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता.


Adult Jokes in Marathi


सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे,

आता सांगा तुम्ही यातून काय शिकलात?

गण्या: सर आता फक्त आपल्याला दारू

आणि चकणा घेऊन जायचं आहे.


Marathi Adult Jokes


गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,

तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?

बंड्या : एकही नाही. कारण,

ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते.

तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील.


बाबा : काल रात्री कुठे होतास?

मुलगा : मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.

बाबा : रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा.

मुलगा : काय ?

बाबा : तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या.


मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.

मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण

आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत.

आई: हरामखोर,

त्या तुझ्या मावश्या आहेत.


marathi vinod

 

गुरुजी : काय समजले नसेल तर विचारा.

बंड्या : गुरुजी फळा पुसल्यावर

फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.

गुरुजी डोकं आपटून मेलं.


नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.

बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,

नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.


marathi jokes sms


शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त

का बाहेर येते?

बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?

मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली.


एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.

Channel वर म्हैस दिसते.

नवरा: ती बघ तुझी नातेवाईक.

बायको: अय्या.

सासूबाई !


comedy jokes marathi

 

आई :- चिंटु लवकर आंघोळ करून घे,

नाहीतर शाळा बुडेल!

चिंटु :- आई बादलीभर पाण्यात

शाळा कशी काय बुडेल् ग ?

आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला.


बायको: अहो ऐकलं कां?

आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.

नवरा: एक ना एक दिवस त्याला

त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते !


गणू: पप्पा जरा कारची चावी दया ना कॉलेज ला जायचंय..

पप्पा: कॉलेज ला जायला कारची काय गरज?

गणू: काय नाय पप्पा, २० लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय..

पप्पा: हे घे २० रुपय, ५० लाखाच्या बसमधून जा,

म्हणजे वादळ येईल वादळ.


बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता?

जे काय बोलायचं ते मला बोला..

नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो, तेव्हा आपण टीव्ही ला काही बोलतो का?

शिव्या तर कंपनीलाच देतो ना..


ह्याला म्हणतात बदला!

मी तिला ३-४ वेळा फोन केला पण तिने उचलला नाही..

नंतर तिला एकच Message केला,

“Balance” आला का?

१००० ला १००० Full Talk Time!

तिने आत्तापर्यंत २० वेळा फोन केला पण मी उचलला नाही..

चुकीला माफी नाही.


Marathi Memes


मुलगा : आय लव्ह यू

मुलगी : नाही मी दुसऱ्यावर प्रेम करते,

मुलगा फुल्ल नाराज होतो.

आणि अचानक काही वेळाने जोरात पळू लागतो.

मुलगी विचारते काय झालं रे?

मुलगा : थांब तुझ्या आईला जाऊन सांगतो.

मुलगी : इकडं ये कुत्र्या, आय लव्ह यू टू.


पत्रकार: कल शाम आपने क्या किया?

रामदास आठवले: पोहे

पत्रकार: अरे वा! हमें भी खिलाओ कभी.

पोहे तो हमें भी पसंद है.

रामदास आठवले: अरे बाबा, वो वाले पोहे नही.

कल हम स्विमिंग पूल मे पोहे..

पहले पाणी मे “शिरा” और बाद मे “पोहा”

इतना आनंद आया की उसको कुछ “उपमा” च नही.


शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या,

बाहेर यायच्या, मला राहवेना,

म्हणून विचारले: आजी काय प्रॉब्लेम आहे?

सारख्या घरात जाताय, बाहेर येताय,

सर्व ठीक आहे ना?

आजी म्हणाल्या: अरे बाबा,

माझी सून योग शिकतिया TV वर बघून,

आन त्यो रामदेवबाबा म्हणतो,

सास को अंदर लो,

Sa सास को बाहर निकालो!

सास को अंदर लो,

Sa सास को बाहेर निकालो!

मेल्याने मलाच नको नको करून ठेवलंय.


आजोबा: बन्या जरा माझी कवळी आन.

बन्या: अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!

आजोबा: माहितीये रे.

समोरच्या गोखले आजींना स्माईल दयायची आहे!


उंदराची टोळी तलवार घेऊन धावत होती,

रस्त्यात वाघ विचारतो अरे का धावता?

उंदीर चल सरक बे तिकडे,

हत्तीच्या आयटमला कुणीतरी प्रपोस केला,

अन नाव आमच्यावर आले.


बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान भाऊ विचारतो,

ताई, फक्त तुच का रडत आहेस,

दाजी का नाही रडत?

वडील: बाळा ताई फक्त गेट पर्यंत रडेल..

मग तिकडून दाजी आयुष्यभर रडतील !


नवऱ्याने शॉपिंग ला वाट्टेल तेवढे

पैसे खर्च केले तरी,

बायको शेवटी ‘Thank You’

दुकानदारालाच म्हणणार.


असं म्हणतात की जिथं एकदा,

विश्वासघात होतो तिथं पुन्हा जाऊ नये,

पण काय करणार,

सासरवाडीत पुन्हा जावंच लागतं.


भन्नाट मराठी विनोद


जर आपली बायको, माहेरी जातांना,

शेजारच्या बायकांना सांगून जात असेल की,

ताई जरा लक्ष ठेवा!

तर समजून जा, तुम्ही CCTV च्या निगराणीत आला आहात.


बायकोच्या चॉईस वर हसण्याची चूक करू नका,

लक्षात ठेवा तुम्हीही तिचीच चॉईस आहात !


आयुष्यात इतकी मान खाली

घालायची वेळ कधीच

आली नव्हती.

जितकी व्हाट्स अँप फेसबुक

मुळे आली आहे !


लव्ह मॅरेज मध्ये आपण आपल्या

प्रेयसी बरोबर लग्न करतो,

आणि अरेन्ज मॅरेज मध्ये आपण

दुसऱ्याच्या प्रेयसी बरोबर

लग्न करतो.


दारुडा दारू पिऊन मेला

पण साला मरता मरता

डायलॉग मारून गेला,

दारू तो ब्रँडेड पिता था

पण साला “लिव्हर” ही

खराब निकला.


बायको: साबुदाणा वडा बनवू का तुम्हाला?

नवरा: नको मी माणूसच ठीक आहे,

आली मोठी जादुगरीन!


किती बरे झाले असते,

जर प्रेमाचा पण इन्शुरन्स असता,

प्रेम करण्या अगोदर प्रीमियम भरला असता,

प्रेमात मुलीची सोबत मिळाली तर ठीक,

नाहीतर त्या मुलीवर केलेल्या खर्चाचा

क्लेम तर मिळाला असता.



Whatsapp Jokes Marathi


बायको : मला घटस्फोट पाहीजे.

नवरा : थंडी संपल्या वर देतो.


बायको : देवा, जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू दे.

नवरा : अरे वा ! इतका आवडतो मी तुला ?

बायको : नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार ?

नवीन माणसाला परत कोण शिकवणार?


सुनबाई: सासूबाई कॅडबरी खाणार का ?

सासूबाई: नको बाई, मला कुठे “सात समुंदर ” वर नाचता येतंय.


डॉक्टर: घाबरू नका देशपांडे, खूप छोटं ऑपरेशन आहे.

पेशंट: थँक यू डॉक्टर, पण माझं नाव देशपांडे नाही.

डॉक्टर: मला माहीत आहे. देशपांडे माझं नाव आहे.


गंपू : तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलंस?

झंपू : आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती,

‘प्लीज ट्राय लेटर’!


बायको : काय हो, इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?

नवरा : बहिणीशी

बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?

नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय.

बिचारा नवरा तेव्हापासून बायकोकडे मोबाईल मागतोय.


शिक्षक : पृथ्वीवरचा सर्वात जुना प्राणी कोणता ?

विद्यार्थी : झेब्रा.

तो अजून ब्लॅक अँड व्हाईट आहे.


सासुरवाडीच्या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे म्हणजे,

फुकटात CCTV बसवल्या सारखे आहे.


दुकानदार : बोला साहेब काय पाहिजे?

ग्राहक : होणाऱ्या बायकोच्या कुत्र्या साठी केक पाहिजे,

दुकानदार : इथेच खाणार कि पॅक करून देऊ !


२ मिनिटांसाठी दुधाला गॅस वर सोडलं

तर दूध पण उपदेश देऊन रहातंय

मुझे छोड़कर जो तुम जाओगे

बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे.


लाईफ पार्टनर असो किंवा नसो पण

पाणीपुरी पार्टनर असलाच पाहिजे.


नवरा बायको एकत्र चहा पिताना बघूनच

वाघ बकरी हे नाव कंपनीला सुचलं असावं.


लग्न पत्रिकेमध्ये स्पष्टपणे नमूद

केले होते.

कृपया दारू पिणाऱ्यांनी येऊ नये

नवरदेवच आला नाही.


मराठी हास्य विनोद


एक पुणेरी पाटी

मिठाई दुकानावरील पाटी

इथे तुम्हाला तुमच्या मेहुणीपेक्षा गोड आणि बायकोपेक्षा

तिखट पदार्थ मिळतील.


डॉक्टर म्हणाले, ३-४ महिने नॉनव्हेज आणि दारू बंद करा,

वाईट वाटलं, पण इलाज नव्हता ,शेवटी मनाची

तयारी केली आणि डॉक्टर बदलला.


आज ती म्हणाली,

मला स्वयंपाक येत नाही

मी म्हणालो,

लग्नाआधी का नाही सांगितलं ?

तरी ती म्हणाली तुला सरप्राईज द्यायचं होतं !


समोरच्या अपार्टमेंटमधील

ती पाच मिनिट हात हलवत होती.

मग मी पण हात केला,

तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला,

व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय.


आयुष्य खूप Boring झालं देवा,

उचल एकदाच..

आणि टाक नेऊन गोव्याच्या बीचवर.


ती मला हे सांगून सोडून गेली,

कि मला दुसरा भेटला आहे.

अरे त्या वेडीला कोण समजावणार

तो दुसरा अकाउंट पण माझाच आहे.


पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे,

तर.

सासू आणि सुनेची जुळली पाहिजे,

संसार सुखाचाच होईल !

मुलगा कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो..

बिच्चारा !


खुशाली विचारायचा काळ गेला आता,

माणूस Online दिसला कि समजायचं,

सर्व काही ठीक आहे.

परमेश्वर सर्वांना Online ठेवो.


मी: Hey Dad Wassup??

पप्पा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे?

मी: Ok ठीक आहे.

मला जरा गरमकेंद्रबिंदू देता का?

पप्पा: हे काय असतं आता?

मी: Hotspot हो पप्पा.

पप्पानी Spot Hot होईपर्यंत धुतला.


वडील: इतका मार खातोस रोज,

तुला राग येत नाही का रे माझा ?

मुलगा: येतो ना !

वडील: मग काय करतोस तू राग आल्यावर ?

मुलगा: मी संडास घासतो !

वडील: संडास घासून राग कसा काय शांत होतो ?

मी संडास तुमच्या टूथब्रश ने घासतो !

मुलाला संडासात घालून मारला.


मराठी विनोद नवरा बायको


एक पोलीस पोलीस स्टेशन मध्ये फोन करतो,

पोलीस स्टेशन : हा बोला.

पोलीस: साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय,

एक खुन झालाय.. इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला,

पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणुन गोळी घातली.

पोलीस स्टेशन : मग तुम्ही तिला अटक केली

का नाही ?

पोलीस: नाही साहेब,

फरशी अजून वाळली नाही !


आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली..

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी संसाराकडे वळाली..

मैत्रिणीने मला विचारलं, “मुलं बाळं काय?”

मी म्हणालो “हो दोन आहेत.

पहिलीला एक अन दुसरीला एक.”

मैत्रीण जागेवर बेशुद्ध!!

परत नीट वाचा !


एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.

ती भडकली,

तिने त्याला धू धू धुतला..

अगदी लोळवला.

तो कपडे झटकत उठला.

आणि म्हणाला.

तर मग मी नाही समजू का.?


गण्या बसस्टॉपवर उभा होता,

एक मोटर सायकल स्वार,

त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले,

” लिफ्ट हवी आहे का?”

‘गण्या : ”नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!


एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू,

डोक्याला आणि खांद्याला लावत होता..

बायको: अव्ह.. हे काय करताय?

शाम्पू डोक्याला लावायचा असतू,

पाटील: अगं येडे.

हा काय, साधा शाम्पू नाही

हा तर Head & Shoulder आहे.!


आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजलं की.

जेवण चांगलं असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो,

पुरी दे रे अजून.


बाबा: झम्पू जरा तुझा मोबाईल दे रे,

झम्प्या : एक मिनिट हा बाबा स्विच ऑन करून देतो..

झम्प्या Item चे फोटो उडवतो,

सर्व मुलींचे मेसेज आणि Number Delete करतो,

आलेले Call Delete करतो,

Memory Card Format मारतो,

बाबा: आभारी आहे. घड्याळ बंद पडले ना,

फक्त Time बघायचा होता.


मी रात्री उशिरा घरात शिरलो

आणि बेडवर पाठ टेकताच.

ती म्हणाली, दारू पिऊन आलात ना ?

मी म्हणालो, खरं आहे.

पण तू कसे काय ओळखलेस ?

ती हसुन म्हणाली, तुमचे घर बाजूचे आहे.


मराठी जोक्स विनोद कॉमेडी


वडील : काय रे! काल रात्री तू शेजारच्या कवीताला काय म्हणाला?

गन्या : कुठं काय म्हटलं?

वडील : मग ती सकाळी सकाळी भांडायला का आली?

गन्या : मला काय माहीत!

वडील: हे बघ.. खरं काय ते सांग, नाहीतर, तुला लय मारीन.

गन्या : आता बघा बाबा.

आपण सकाळी चहा पीत असतांना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो?

वडील : या चहा प्यायला.

गन्या : दुपारी आपण जेवत असतांना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो?

वडील : या जेवायला.

गन्या : आता रात्री कवी आपल्या घरी आली तेव्हा मी झोपत होतो,

म्हणून मी तिला म्हटलं ये झोपायला !

वडील कोमात, गन्या जोमात !


दुकानदार : बोला साहेब काय पाहिजे?

ग्राहक : होणाऱ्या बायकोच्या कुत्र्या साठी केक पाहिजे,

दुकानदार : इथेच खाणार कि पॅक करून देऊ !


मी एका हॉटेल मध्ये एकटा बसलो होतो,

तिथे एका मुलीने जवळ येऊन विचारले,

‘तू सिंगल आहेस का?’

मी मनातल्या मनात खुश होऊन बोललो, ‘हो ’

माझ्या समोरची रिकामी खुर्ची

घेऊन गेली ना राव ती !


मित्रांनो घरचे जोक्स ऐकून नक्कीच तुम्हाला थोडं तरी हसू आलंच असेल जरी तुम्हाला अजून हसू आलं नसेल तर आम्ही आमच्या अजून काही जप जोक्स इन मराठी पोस्ट आहेत त्या आम्ही तुमच्यासाठी सादर करून आणि त्या तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा. प्रत्येक जण त्याच्या जीवनामध्ये त्रास किंवा कायमच काम करत असतो पण तो कधीच स्वतःसाठी वेळ काढत नाही किंवा इतरांसोबत हसून खेळून बोलत नाही तर हाच वेळ परत आणण्यासाठी आम्ही तुमचं मन थोडसं रिलॅक्स करण्यासाठी आम्ही हे मस्त मस्त जोक्स घेऊन आलो आहोत जे तुम्हाला कायमच हसवत राहतील आणि तुम्ही देखील इतरांसोबत शेअर करून त्यांना हसवत राहाल अशी आशा जे सर्व काही लोक आहेत तर ते कायमच इतरांच्या परिस्थितीवर हसतात पण परिस्थितीवर असण्यापेक्षा आपण स्वतः मराठी जोक ऐकून असलेल्या कधीही बरं कारण देव कधीच आपल्याला माफ करत नाही जर आपण दुसऱ्याच्या परिस्थितीवर हसलो आहोत तर एक ना एक दिवस तो समोरचा माणूस देखील आपल्या परिस्थितीवर हसतो किंवा आपली थट्टा उडवतो तर काय मी लक्षात ठेवा की कधीच कोणाच्या वाईट वेळेवर हसू नका जर त्यावर वाईट वेळ आलेली आहे तर त्यांना मदत करा त्यातून त्यांना बाहेर काढा पण कधीही हसू नका जर तुम्हाला असेच असेल तर आमच्या पोस्टमध्ये दिलेल्या जे सर्व काही मराठी जोक्स आहेत तर ते वाचून तुम्ही नक्की असा.कारण जशी आपली परिस्थिती आता चांगली आहे तर एक ना एक दिवस असा येतो की आपली परिस्थिती देखील वाईट होती आणि आपल्यावर देखील लोक असतात कोणी जर आपल्यावर असलं तर ते आपल्याला कधीच बरं वाटत नाही पण जेव्हा आपण दुसऱ्यावर हसतो तेव्हा ते खूप चांगले वाटते तर हे जे कारण आहे तर हे कायम आपण लागू करून आपण कधीच कोणावर असल्याने पाहिजे आपल्याला असेच असेल तर आपण आपल्या मित्रांसोबत हे जे सर्व काही मराठी जोक्स आहेत तर ते शेअर करून नक्की असलंच पाहिजे. दिवसाच्या जीवनामध्ये हसू हे खूप महत्त्वाचा आहे माणसाने कायम हसत राहिला पाहिजे असल्याने त्याच्या मेंदूच्या ज्या काही शिरा किंवा स्पंदन आहेत तर ते थोडेसे विश्रांती घेतात आणि त्याच्या शरीराला थोडासा आराम भेटतो त्याचे दगदगीचा मन आहे त्याला देखील थोडासा आराम भेटतो त्यासाठीच आम्ही बोलतोय की कायम हसत रहा आणि जर तुम्हाला हसू येत नसेल तर आमची पोस्ट बघा त्यामध्ये आम्ही खूप जास्त नवनवीन जोक्स इन मराठी टाकलेल्या आहेत तर ते प्रत्येकाला आवडतीलच अशी आशा जरी देखील ते तुम्हाला आवडले नाही तर तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही अजून नवनवीन आणि छान छान जोक्स तुम्हाला हसवण्यासाठी उपलब्ध करून देऊ. पण तरीही आमची अशी आशा की वरती दिलेले सर्व जोक्स जे आहेत ते तर तुम्हाला नक्की आवडले असतील कारण जोक हा प्रत्येक माणसाच्या जीवनातला खूप महत्त्वाचा घटक किंवा एक महत्त्वाचा टप्पा आहे तर त्या टप्प्यामध्ये माणसाला स्वतःचा विचार करून असावाच लागतो किंवा आपण मित्रांमध्ये बसलोय आणि एक खूप मस्त जोक झाला आणि तुम्ही एकदम खळखळून असला तर खळखळून असल्यामुळे एकतर तुमचे नाते देखील मजबूत होता आणि तुमची जे शरीर व्यक्ती आहे तर ती देखील चांगली होते स्ट्रेस तणाव चिंता या सर्व गोष्टींपासून माणूस थोडा निवांत होतो आणि आपल्या जीवनाचा विचार करतो यासाठीच माणसाने कायम असले पाहिजे. हसणं म्हणजे काय हो प्रश्न म्हणजे आपण जर चार चौघात बसलो आहे एखादा खूप निघाला तर त्याला म्हणतात आपण कायम मित्रांसोबत फिरत असतो तर फिरता फिरता एखादी गोष्ट घडली आणि खूप मोठा जॉब झाला तर आपण खूप खळखळून असतो तर त्याच हसण्यामुळे आपल्या शरीर देखील चिंतामुक्त होतं असण्याचे खूप सारे फायदे आहेत आज कालचा जो काळ चालला आहे की या काळामध्ये आपण प्रत्येक वेळेस एक नाही गोष्ट अशी ऐकतो की त्यामुळे आपल्याला कोणत्यातरी कारणामुळे का होईना दुःख होते गोष्टी अशा असतात की आज हा वारला काल तो वारला या ज्या सर्व काही गोष्टी आहे त्यामुळे माणूस निराश होतो पण जर आपण याच गोष्टीला तोड देत जर कायम हसत राहिलो तर आपल्याला कधीच हे वाईट विचार येणार नाही आणि आपण आपल्या जीवन खूप मस्त रीतीने पार पाडत आपण इतरांसारखे जर याच गोष्टींमध्ये अडकून राहिलो तर आपण कधीच मोठे होणार नाही किंवा कधीच पुढे जाणार नाही जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला हसावच लागणार असं तरी मला वाटतं जरी पोस्ट तुम्हाला आवडली तर इतरांसोबत शेअर करून तुम्ही खळखळून हसा आणि हे जोक देखील कॉपी-पेस्ट करून असा...


Post a Comment

Previous Post Next Post