10+ new joke in marathi.

10+ new joke in marathi. 

आज पण एक नवा जोक ऐकला काय तर तुमच्या आनंदासाठी व तुम्हाला कळकळून हसवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत खूप छान छान मराठी जोक. हे जोक नक्कीच तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ऐकले असाल जर नसेल ऐकला तर आम्ही खूप सारे नवे जो काही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हे सर्व जोक मराठी भाषेमध्ये आहेत जेणेकरून हे तुम्हाला समजण्यास आणखीन सोपे जाईल. जोक ऐकल्याने माणसाला हसू येते आणि असू आले की मन व डोकं सगळं शांत राहते हे सर्व जग तुम्हाला आवडतील अशी आशा करतो हे जर जग तुम्हाला आवडले तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा.

Husband wife non veg jokes in Marathi.



लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे?

लहानपणी चिवडा, फरसाण, चकली

याला खाऊ बोलणारी मुले,

मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात.


गुरुजी: बंडू खरं-खरं सांग नाहीतर,

चड्डी काढून मारेन तुला.

बंडू: पण सगळी चूक माझी आहे,

तुम्ही का चड्डी काढताय ?


आयुष्यात इतकी मान खाली

घालायची वेळ कधीच

आली नव्हती.

जितकी व्हाट्सअँप फेसबुक

मुळे आली आहे !


लव्ह मॅरेज मध्ये आपण आपल्या

प्रेयसी बरोबर लग्न करतो,

आणि अरेन्ज मॅरेज मध्ये आपण

दुसऱ्याच्या प्रेयसी बरोबर

लग्न करतो.


Marathi Jokes



ट्रेन मध्ये गावाकडील बाई लहान

बाळाचे लंगोट बदलत असते.

शहरी बाई: हग्गीस नाही का?

गावाकडील बाई: नाही, फक्त मूतीस.


दारुडा दारू पिऊन मेला

पण साला मरता मरता

डायलॉग मारून गेला,

दारू तो ब्रँडेड पिता था

पण साला लिव्हर ही

खराब निकला.


आई: बेटा तू केस का कापत नाही?

मुलगा: फॅशन आहे आई

आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय

लहान मुलगी पसंद आहे म्हणून,

आता जा नांदायला.


बायको: साबुदाणा वडा बनवू का तुम्हाला?

नवरा: नको मी माणूसच ठीक आहे,

आली मोठी जादुगरीन!


शेवटी आज आई बोललीच,

बाळा बायको कमी शिकलेली

असली तरी चालेल, पण.

Facebook, Whatsapp वापरणारी नको,

आपल्या घरी इतर कामं पण असतात....


तिचा फोन आला,

खुप अकडुन ती म्हणाली,

विसरुन जा मला.

मी म्हणालो,

आधी नाव तरी सांग कोण आहेस तु?


एका भारतीय महीलेचा मोदींना प्रश्न,

मंगळ सुत्रात ब्लॅक मनी चालतील का?

का ते पण काढुन टाकायचे....


गांधीजी म्हणाले,

दारू सोडा आणि पाणी प्या.

तेव्हापासून लोक तिन्ही

एकत्र करून पितात.

नीट वाचा....


Very Funny Jokes in Marathi



लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न:

उत्तर फक्त हो किंवा

नाही मध्ये द्यावे,

आता तुमच्या बायकोने तुम्हाला

मारणे बंद केले आहे का?


मी: Hey Dad Wassup??

पप्पा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे?

मी: Ok ठीक आहे..

मला जरा गरमकेंद्रबिंदू देता का?

पप्पा: हे काय असतं आता?

मी: Hotspot हो पप्पा.

पप्पानी Spot Hot होईपर्यंत धुतला.


Dirty Jokes in Marathi



एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.

ती भडकली,

तिने त्याला धू धू धुतला..

अगदी लोळवला.

तो कपडे झटकत उठला.

आणि म्हणाला.

तर मग मी नाही समजू का.?


परीक्षा सभागृहातील सर्वात चांगली गोष्ट कोणती?

हे एकच ठिकाण आहे कि जिथे तुम्ही मुलीला मोकळेपणाने बोलू शकतो.

” जरा दाखव कि ” आणि बऱ्याचवेळा ती दाखवतेही.


गण्या बसस्टॉपवर उभा होता,

एक मोटर सायकल स्वार,

त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले,

” लिफ्ट हवी आहे का?”

‘गण्या : ”नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!


बायको : अहो मी एक रुपयाचे 3 कांदे आणले,

नवरा : कसे काय?

बायको :-एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला.

नवरा : मग तिसरा ?

बायको :-तिसरा त्याने मला फेकून मारला !


Panchat Jokes in Marathi


गणू: पप्पा जरा कारची चावी दया ना कॉलेज ला जायचंय..

पप्पा: कॉलेज ला जायला कारची काय गरज?

गणू: काय नाय पप्पा, २० लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय..

पप्पा: हे घे २० रुपय, ५० लाखाच्या बसमधून जा,

म्हणजे वादळ येईल वादळ.


बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता?

जे काय बोलायचं ते मला बोला..

नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो, तेव्हा आपण टीव्ही ला काही बोलतो का?

शिव्या तर कंपनीलाच देतो ना..


सुखी राहायचं असेल, तर नेहमी आतला आवाज ऐका.

आतला आवाज म्हणजे,

स्वयंपाकघराच्या आतला आवाज

“अहो ऐकल का ”


ह्याला म्हणतात बदला!

मी तिला ३-४ वेळा फोन केला पण तिने उचलला नाही..

नंतर तिला एकच Message केला,

“Balance” आला का?

१००० ला १००० Full Talk Time!

तिने आत्तापर्यंत २० वेळा फोन केला पण मी उचलला नाही..

चुकीला माफी नाही.


मुलगा : आय लव्ह यू

मुलगी : नाही मी दुसऱ्यावर प्रेम करते,

मुलगा फुल्ल नाराज होतो.

आणि अचानक काही वेळाने जोरात पळू लागतो.

मुलगी विचारते काय झालं रे?

मुलगा : थांब तुझ्या आईला जाऊन सांगतो.

मुलगी : इकडं ये कुत्र्या, आय लव्ह यू टू.


मुलगा: मला तुझी आठवण आली कि,

मी तुझा फोटो बघतो..

मुलगी: अय्या, आणि माझा आवाज

ऐकावासा वाटला तर तू काय करतोस?

मुलगा: शेजारच्या कुत्रीला दगड मारतो.


पत्रकार: कल शाम आपने क्या किया?

रामदास आठवले: पोहे

पत्रकार: अरे वा! हमें भी खिलाओ कभी.

पोहे तो हमें भी पसंद है.

रामदास आठवले: अरे बाबा, वो वाले पोहे नही.

कल हम स्विमिंग पूल मे पोहे..

पहले पाणी मे “शिरा” और बाद मे “पोहा”

इतना आनंद आया की उसको कुछ “उपमा” च नही.....


Funny Jokes in Marathi for Friends


आयुष्यात अश्रू पुसणारे बरेच मित्र मिळतील,

पण नाक पुसणारे मिळणार नाहीत.

म्हणुन रुमाल नेहमी सोबत ठेवा.


३ मुंग्यांना १ केक दिसतो.

पहिली जाते आणि केक खाते.

दुसरी पण जाऊन खाते.

तिसरी नाही खात का ?

ती म्हणते: शिईईईई.

केक ला मुंग्या लागल्यात!


एक बाई दुसऱ्या बाईला विचारते,

तुम्ही गहु कसा आणला?

२: पिशवीतून आणला..

१: तसे नाही हो, कोणत्या भावाने आणला?

२: चुलत भावाने आणला.


बायकोचा राग आला तर तो गिळा,

नाहीतर गिळायला मिळणार नाही.


तुमचे वडील गरीब असतील,

तर ते तुमचं दुर्भाग्य.

पण तुमचा सासरा गरीब असेल,

तर तो तुमचाच गाढवपणा.


Marathi Chavat Vinod


एक गरोदर बाई डॉक्टर कडे जाते,

डॉक्टर तिला विचारतात कितवा महिना?

बाई म्हणते आठवा.

डॉक्टर म्हणतात,

ईश्श्श मी कसा आठवु! तुम्हीच सांगा.


आजोबा: बन्या जरा माझी कवळी आन.

बन्या: अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!

आजोबा: माहितीये रे.

समोरच्या गोखले आजींना स्माईल दयायची आहे!


मुलगी (Customer Care ला): मला १ मेसेज,

१५ जणांना पाठवायचा आहे, कसा करू?

Customer Care: मेसेज काय आहे?

मुलगी: हाय जानू, काय करतोयस?

माझा रिचार्ज संपलाय १०० चा रिचार्ज कर ना.


ज्याप्रकारे पापाचा घडा भरला कि मृत्यू होतो,

त्याचप्रकारे आनंदाचा घडा भरला कि लग्न होते !


बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान भाऊ विचारतो,

ताई, फक्त तुच का रडत आहेस,

दाजी का नाही रडत?

वडील: बाळा ताई फक्त गेट पर्यंत रडेल.

मग तिकडून दाजी आयुष्यभर रडतील !


जर बायको ऐकत नसेल तर

सरळ चप्पल काढा

आणि घालून बाहेर पडा.

तुम्ही जो विचार करत होतात

त्यासाठी वाघाचं काळीज लागतं राव.


Husband Wife Jokes in Marathi


एका बाईला १० मुलं असतात.

पत्रकार : अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय?

बाई : मुन्नू.

पत्रकार : बरं, या दुस-या मुलाचं नाव काय?

बाई : मुन्नू.

पत्रकार : बरं, आणि या बाकिच्या मुलाचीं नाव काय आहेत?

बाई : सगळ्यांची नावं मुन्नू.

पत्रकार : अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं?

बाई : अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना.


मास्तर : सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का

मुलगा : आहे ना

मास्तर : कोणती सांग

मुलगा : टिंब. ?

मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली ?


बंडया रडत रडत घरी आला.

बाबांनी विचारले, “काय झाले बंडया?”

बंडया: मास्तरांनी मला मारलं.

बाबा: काहितरी आगावूगिरी केली असशील.

बंडया: नाही बाबा. मास्तरांनी प्रश्न विचारला की ३ लिंगे कोणती?

बाबा: मग तू काय म्हणालास?

बंडया: पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुसलिंग.

बाबा: बरोबर आहे. मग का मारलं?

बंडया: मास्तरांनी उदाहरण विचारले

बाबा: तु काय म्हणालास?

बंडया: तो फळा, ती शाळा आणि ते मास्तर....


बाबा : काल रात्री कुठे होतास?

मुलगा : मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.

बाबा : रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा.

मुलगा : काय ?

बाबा : तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या.


बायको : मला घटस्फोट पाहीजे.

नवरा : थंडी संपल्या वर देतो.


Marathi Jokes for Kids


गंपू : तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलंस?

झंपू : आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती,

‘प्लीज ट्राय लेटर’!


गर्लफ्रेण्ड: प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन.

बॉयफ्रेण्ड: का?

गर्लफ्रेण्ड: बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन,

आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन.


Marathi Chutkule


लग्न पत्रिकेमध्ये स्पष्टपणे नमूद

केले होते.

कृपया दारू पिणाऱ्यांनी येऊ नये

नवरदेवच आला नाही.


रात्री भुताची मालिका बघून

झाल्यावरचा संवाद:

बायको: अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा,

मला भीती वाटतेय..

नवरा: हा, म्हणजे मी भिऊन मरतो.


एक पुणेरी पाटी

मिठाई दुकानावरील पाटी

इथे तुम्हाला तुमच्या मेहुणीपेक्षा गोड आणि बायकोपेक्षा

तिखट पदार्थ मिळतील.


डॉक्टर म्हणाले, ३-४ महिने नॉनव्हेज आणि दारू बंद करा,

वाईट वाटलं, पण इलाज नव्हता ,शेवटी मनाची

तयारी केली आणि डॉक्टर बदलला..


मुलगी: नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा.

मुलगा: ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा कितवा?


आज ती म्हणाली,

मला स्वयंपाक येत नाही

मी म्हणालो,

लग्नाआधी का नाही सांगितलं ?

तरी ती म्हणाली तुला सरप्राईज द्यायचं होतं !


समोरच्या अपार्टमेंटमधील

ती पाच मिनिट हात हलवत होती..

मग मी पण हात केला,

तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला,

व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय.


Double Meaning Jokes in Marathi


एकदा नवरा बायको खुप भांडत असतात,

नंतर बायको लुंगी आणून

नवऱ्याच्या अंगावर फेकते,

बायको: बदला लुंगी

नवरा: (घाबरून) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत.... ?


सरदार: डॉक्टर मला जेवण केल्यावर

भूक लागत नाही, झोपून उठल्यावर

झोप येत नाही, काय करू?

डॉक्टर: रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल....


जो नेहमी हसत असतो त्याला

HAS MUKH म्हणतात.

आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला

HUS BAND म्हणतात....


चिंटुः आई परी आकाशात उडते का गं?

आईः हो..

चिंटु: मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात?

आईः अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का?

चिंटुः पण बाबा तिला तर परी म्हणतात,

आईः हो का! मग उद्या उडेल ती बघच तु !


आई: बेटा तू केस का कापत नाही?

मुलगा: फॅशन आहे आई

आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय

लहान मुलगी पसंद आहे म्हणून,

आता जा नांदायला....


Marathi Jokes


बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास?

जरा त्या पिंकीकडे बघ,

तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.

चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो....


एक मैत्रीण :- तु खुप बोर झाल्यावर काय करतेस ?

दुसरी :- मस्तपैकी मॉलमध्ये जाते,

मन भरेपर्यंत शॉपिंग करते,

आणि ट्रॉली काऊंटरलाच सोडून घरी येते....


बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे,

कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.

नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना !


एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,

तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,

बायको: काय आहे?

नवरा: या २ वायरांपैकी एक जरा धर,

बायको: हं धरली,

नवरा: काही जाणवलं का?

बायको: नाही,

नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या

वायरमध्ये आहे तर !


Marathi Jokes SMS


एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते.

आणि ३ दिवसांनी परत घरी येते,

वडील(रागाने): आता काय हवंय?

मुलगी: बारीक पिनचा चार्जर !


काही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस

My dad is my real hero

मग आमच म्हातार काय

नीळू फुले आहे का.


बायको: अहो ऐकलं कां?

आपले लग्न लावून देणारे भटजी वारले..

नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते !


टिचर: बंडया तु वर्गात

सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?

बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला

Whatsapp परवडत नाही.


एक महिला डॉक्टरांना: यांना ठिक करा हो,

हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात,

डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे,

तुम्ही फार लकी आहात,

स्त्री: कसली लकी,

उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून !


नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..

बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,

नवरा: हो.. तु स्वयंपाक कर,

मी अंगणात चटई टाकतो.......


सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे,

आता सांगा तुम्ही यातून काय शिकलात?

गण्या: सर आता फक्त आपल्याला दारू

आणि चकणा घेऊन जायचं आहे...


अगर कभी टूट कर बिखर जाओ तो मुझे याद

कर लेना .

क्यों की मेरे पास रुपये 5/-


पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?

डॉक्टर:- ३ लाख रुपये..

पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर ?


बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे..

नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..

लागला ना डोक्याला शॉट,

वाचा नीट परत एकदा..


Adult Jokes in Marathi


बायको: अहो एक सांगू का,

पण मारणार तर नाही ना?

नवरा: हो सांग ना,

बायको: मी गरोदर आहे,

नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे,

मग तू एवढी घाबरतेस का?

बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती,

तेव्हा त्यांनी मारलं होतं !


तो तिला म्हणाला,

जीना सिर्फ मेरे लिए !

ती म्हणाली,

ठीक आहे मी लिफ्ट ने जाते,

तू ये जिन्याने.


दिवाळीत चकली, शेव,

बेसनाचे लाडू कमी खा.

रात्री 10 नंतर मोठ्या आवाजावर बंदी आहे.


जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?

नेने : हो, पण पैसे पडतील

जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी.


आज पेपर मध्ये जाहिरात होती.

एक साडी घ्या व 50% वाचवा

मी पेपरच फाडला व 100%वाचवले.


नातेवाईकांना फेसबुक फ्रेन्ड बनवणे

म्हणज फुकटात cctv बसवणे.


पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना

पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत

पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण

आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय?


April Fool Jokes in Marathi


विवाहित पुरुषांचं पोट वाढण्याचा कारण..

मित्रांन सोबत पोट भरून पार्टी केल्या नंतर..

बायकोच्या भीतीने घरी जाऊन परत जेवण करणे..


कधी कधी हे कळत नाही की?

Internet free आहे की आपण ?


सासू: कित्ती वेळा सांगितलंय

बाहेर जातांना टिकली लावत जा

सूनबाई: अहो सासूबाई, जीन्सवर

कुणी टिकली नाही लावत

सासू: अगं जीन्सवर नाही,

कपाळावर लाव, भवाने !


जोशी : “मी इथले टाॅयलेट वापरु का ?”

नेने : “हो, पण पैसे पडतील !”

जोशी : नाही पडणार बसताना काळजी घेईन !


गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,

तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?

बंड्या : एकही नाही. कारण,

ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते.

तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील.


भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना

पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?

भिकारी : हा आहे साहेब

पुणेकर : आधी ते खर्च कर.


पप्पूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरु झाला.

एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो.

तू माझ्यात असं काय पाहिलंस की मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस ?

पप्पूची बायको : मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं.


बायको: माझी एकअट आहे!

नवरा : काय?

बायको: तूम्ही या दिवाऴीत सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार. ☺

नवरा: माझी पण एक अट आहे?

बायको: काय?

नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?


नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे,

बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न.

मला कशाला गटवलीत?

नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा.


मराठी जोक्स


पुणेकर आपल्या मुलाला खुप मारत होता.

शेजारी :- का मारता आहात मुलाला ?

पुणेकर :- अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते,

हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.

शेजारी :- अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना.

पुणेकर:- अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात.


पिंकी : मस्त मोबाईल आहे कुठून घेतलास. ?

झंप्या : विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.

पिंकी : कितीजण होते धावायला ?

झंप्या : मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !


पुणेकर : काका पावशेर रताळे द्या

दुकानदार : पिशवीत देऊ?

पुणेकर : नाही नाही, पेन ड्राईव्ह आणलाय.

त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात.


बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या.

वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत !

बंड्या : एक किक् मारायला, न् एक गिअर बदलायला.

लय हानला !


शिक्षक : उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन

गण्या : ओके सर, पण जरा झणझणीत बनवा.


तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल,

तर अविवाहित असतांना बदला.

लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण

बदलू शकत नाही.


बायकांची प्रार्थना

हे देवा माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे, माझ्यासाठी काही नको.

त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी बघते.


परदेशी नवरे बायकोने केलेला स्वयंपाक काट्याने खातात,

भारतीय मुकाट्याने !


गुरुजी- दळणवळण म्हणजे काय?

विद्यार्थी- एखादी मुलगी दळण घेऊन

जाताना वळून पाहते त्याला दळणवळण म्हणतात.

गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत.


Chavat Jokes in Marathi..


​एस टि स्टॅन्ड वर पुण्याची मुलगी

आपल्या काॅलेज स्टाईल मध्ये तुच्छतेने बस कंडक्टरला विचारते,

“हे डबडं केव्हा हलणार इथून? ”

कंडक्टर: “कचरा भरल्यानंतर लगेच!”

कारण कंडक्टर सोलापूरचा होता.


जेव्हा मुलगी पळून जायची धमकी देते,

तेव्हा आई-बाबांनी काय करावं?

तिचं टक्कल करावं!

५ – ६ महिने पळून काय

घरातून बाहेर पण पडणार नाही.

टकली !


जगातील सगळ्यात फास्ट

नेटवर्क दोन प्रकारे आहे..

1) Email

2) Female

एका मिनिटात इकडची गोष्ट

तिकडे पोहचवतात!


एका मठावर गेलो होतो,

सात साधू सात चटयांवर बसले होते,

मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले,

बाबा पोरी भाव देत नाहीत काय करु?

बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,

गोमटेश्वरा आणखी एक चटई टाक बाबा.


गर्लफ्रेंडचे वडील: पगार किती तुला?

पप्पु: 16000..

गर्लफ्रेंडचे वडील: माझ्या मुलीला मी 15000 पॉकेट मनी देतो..

पप्पु: तेच धरुन 16000!


Whatsapp Jokes Marathi


एक शेतकरी खुप आजारी असतो,

त्याची पत्नी म्हणते: तुमचा ताप वाढतच चाललाय,

थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते,

खुराडयातला कोंबडा खडबडून जागा होतो,

कोंबडा म्हणतो: ओ ताई! आधी क्रोसीन देऊन पहा ना,

लगेच काय चिकन सूप?


काल एका मुलीँला मस्करीत म्हणालो,

दिल चीर के देख, तेरा हि नाम होगा

कालपासून चाकू घेऊन मागे लागलीये !

येडी.. कुठली !


मोबाईल विकत घेतल्यावर,

आणि लग्न केल्यावर,

माणसाला एकाच गोष्टीचा

राग येतो.

थोडं अजुन थांबलो असतो,

तर चांगलं मॉडेल मिळालं असतं.


१२ वी नंतर ग्रॅडजुएशन करणे

तितकेच महत्वाचे असते,

जितके मेल्यानंतर तेरावा करणे

महत्वाचे असते..

होत काहीच नाही, फक्त आत्म्याला

शांती मिळते !


यमराज : बोल मानवा, तुला कुठे

जायचं आहे, स्वर्गात कि नरकात?

मानव : देवा, पृथ्वीवरून माझा

Mobile आणि Charger मागवून घ्या.

मी कुठे पण राहायला तयार आहे!


Santa Banta Jokes in Marathi


टिचर: कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा!

गण्या: आलिया भट्ट..

टिचर: माकडा ! वर्गाच्या बाहेर हो!

मक्या: ओ मॅडम, बोबडा आहे तो.

त्याला ‘आर्यभट’ म्हणायचंय!...


BF: मला तुझे दात खूप आवडतात.

GF: अय्यां खरंच का रे?

BF: कारण Yellow माझा फेवरेट कलर आहे....


मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने

मच्छर खाल्ले,

बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस

डॉक्टरला बोलाव,

मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण

नाही बाईसाहेब.

मी त्याला All Out पाजले आहे....


डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?

नवरा: बरं वाटतंय तिला आता,

आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय....


ATM मधून 200 रुपये

निघतांना इतका आवाज होतो की,

असे वाटते चुकून 4-5 हजार निघतात की काय..

मशीन पण चेष्टा करते गरीबाची....


बायको: माझी एक अट आहे,

नवरा : काय?

बायको: तूम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार,

नवरा: माझी पण एक अट आहे,

बायको: काय?

नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे....


एक छोटी मुलगी दुकानदाराला विचारते,

काका तुमच्याकडे

चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?

दुकानदार: हो आहे ना.

मुलगी: मग लावत जा ना काळ्या,

मी रोज किती घाबरते...


आज मी ३३ कोटी देवांना एकच विनंती केली.

मला संपत्ती नको,

M मला बंगला नको,

मला नोकरी नको,

मला गाडी नको,

फक्त सगळ्या देवांनी एक-एक, रुपया द्यावा... !


सासु आणि सुन यांचं का पटत नाही

माहीत आहे का? नावातच घोड आहे,

सा – सारख्या

सु – सुचना

आणि

सु – सुचना

न – नको....


पप्पू जिलेबी विकत होता,

पण ओरडून सांगत होता,

बटाटे घ्या, बटाटे घ्या.

प्रवासी – पण ही जिलेबी आहे.

पप्पू – गप्प! नाहीतर माश्या येतील....


Post a Comment

Previous Post Next Post