शुभ सकाळ मराठी सुविचार – सत्य आणि स्पष्ट बोलणारा

शुभ सकाळ मराठी सुविचार – सत्य आणि स्पष्ट बोलणारा

नमस्कार मित्रांनो आज आम्ही घेऊन आलो आहोत गुड मॉर्निंग मेसेजेस म्हणजे आज तुमचे सकाळ आम्ही खूप छान आणि सुखद करणार आहोत जेणेकरून तुमची सकाळ खूप चांगली जाईल व जर सकाळी ची सुरुवात चांगली झाली तर तुम्हाला दिवसभर तेज व एकदम तजेलदार वाटेल तसेच आम्ही अजून खूप सारे कोट्स व मेसेज घेऊन येणार आहोत तर तुम्ही आमच्या सोबत नक्की रहा आणि खाली दिलेल्या गुड मॉर्निंग मेसेजचा आनंद घ्या.Marathi Quotes Good Morning – शुभ सकाळ मराठी सुविचार, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला शुभ सकाळ मराठी सुविचार वाचायला मिळतील


Marathi Quotes Good Morning



विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण

कारल कडू .

ऊस गोड तर

चिंच आंबट होते

हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच

भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे

दोष कर्माचा असतो.

 शुभ सकाळ 


विस्कटलेल्या नात्यांना

जोडायला प्रेमाची गरज भासते,

बिखरलेल्या माणसांना

शोधायला विश्वासाची

साथ लागते,

प्रत्येकाच्या जीवनात

येतात वेगवेगळी माणसं, पण

पाहिजे ती व्यक्ती भेटायला

मात्र नशिबच लागते.!

॥शुभ सकाळ॥

॥शुभ दिन॥


वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी…

अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!!

जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते….

 शुभ सकाळ 


वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…

आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात

गणपती दर्शनाने करूया…

शुभ सकाळ !


लिहताना जपावे ते अक्षर मनातले,

रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,

बोलताना जपावे ते शब्द ओठातले,

आणि हसताना विसरावे दु:ख जीवनातले..

॥शुभ दिन॥


रेषा किती विचित्र असतात…

मस्तकावर ओढली तर नशीब घडवतात…

जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात…

शरीरावर ओढली तर रक्तच काढतात…

आणि नात्यात ओढली तर भिंत बनवतात….

‘नातं’ म्हणजे काय???…. सुंदर उत्तर……

“समोरच्याच्या मनाची काळजी….. तुम्ही तुमच्या

मनापेक्षा जास्त घेता…..”

याची जाणीव म्हणजे ‘नातं’….

 शुभ सकाळ


रात्री झोपायच्या वेळेला

तीचाच वीचार मनात येतो

तीला आठवता आठवता

कधी झोप लागले कळतच नाही

सकाळी सकाळी स्वप्नात पण तीच राहते

तीच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी होतात मग

तिच्यासोबत फीरायला जायाच ठरत,

बस आता तीच्या हातात हात टाकायची वेळ येते

आणि

.

.

.

आई म्हणते पोटाळ्या

ऊठ किती झोपत…!

हि मजा असते सकाळची

*शुभ सकाळ*


प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार


Marathi Quotes Good Morning



रात्र संपली, सकाळ झाली.

इवली पाखरे किलबिलू लागली.

सूर्याने अंगावरची चादर काढली.

चंद्राची ड्युटी संपली

उठा आता सकाळ झाली!

शुभ सकाळ



रात्र ओसरली दिवस उजाडला,

तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,

चिलमील किरणांनी झाडे झळकली,

सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…

शुभ प्रभात… शुभ दिन!



राग एकटाच येतो,

पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातो.

संयमसुध्दा एकटाच येतो,

पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो.

फक्त निवड कोणाची करायची हे आपणंच ठरवायचे आहे.

 शुभ सकाळ 


राग आल्यावर थोडं थांबलं, आणि

चूक झाल्यावर थोडं नमलं,

तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात …...

शुभ सकाळ 


शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार



रस्त्यात जर एखादे मंदिर दिसले

तर प्रार्थना केली नाही तरी चालेल

पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल

तर प्रार्थना जरुर करा….

कदाचित कोणचे प्राण वाचतील..

रस्ता कितीही दगड खड्यांनी

भरलेला असला तरी

एक चांगला बुट घालुन त्यावर

आपण सहज चालु शकतो.

परंतु चांगल्या बुटामध्ये

एक जरी खडा असला तर

चांगल्या रस्त्यावर

काही पावले चालणे कठीण होते.

मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही

तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.

”आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना मदत करा

शुभ सकाळ 


यशाची उंची गाठताना

कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका

नशिब हे लिफ्टसारखं असतं

तर कष्ट म्हणजे जिना आहे

लिफ्ट कधीही बंद पडू शकते

पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो…

शुभ सकाळ


यशस्वी व्हायचं असेल तर,

सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!

जेव्हा तुम्ही जिंकू लागता;

तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…..

 शुभ सकाळ 


यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर

दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य ….

कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही …

तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.

 सुप्रभात 

आपला आजचा दिवस आनंदात जावो 


Marathi Quotes Good Morning



मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व

सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या

” नेटसम्राटांना ”

शुभ सकाळ


मोठ्या झाडाखाली लहान

झाड वाढत नाही हे खरं आहे

पण मोठ्या झाडाचा आधार घेऊन

वेल होऊन वाढल्यास झाडाच्या शेंड्यावर सुद्धा

आपलं अस्तित्व दाखवता येतं

बदल करून तर बघा तुमचं अस्तित्व

जाणवल्याशिवाय राहणार नाही

 शुभ सकाळ 

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा



मोठं व्हायला ओळख नाही..

आपल्या माणसांची मन जपावी लागतात..

प्रत्येक गोष्टीत रागवणारी माणसं तीच असतात…..

जी वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त ,,,

दुसर्यांची काळजी घेतात….?

 शुभ सकाळ 


मैत्रीत शिकावं, शिकवावं,

एकमेकांना समजावून घ्यावं.

खुल्या मनानं कौतुक करावं,

चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणानं सांगावं.

खरे तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं,

मात्र आदरयुक्त मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.

मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं, जिव्हाळ्याचं,

विश्वासाचं एक संजीवन नातं असावं..!

 शुभ सकाळ 


Marathi Quotes Good Morning


मी लोकांसाठी माझे विचार व

राहणीमान बदलू शकत नाही…

कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा

ती दुरावलेली मला चालतात …!!!

शुभ सकाळ


मित्र खुप जोडा,

पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका !!!

शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून

माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा होत नसतो…

कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते.

शुभ सकाळ 

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,

यावरून त्याची किंमत होत नसते,

तो इतरांची किती किंमत करतो,

यावरून त्याची किंमत ठरत असते…

शुभ सकाळ!


माणुस मनापर्यंत पोहोचला …

तरच नातं निर्माण होतं …

नाहीतर ती फक्त ओळखच ठरते … !!

असे जगा की आपली ‘उपस्थिती’ कुणाला जाणवली नाही तरी चालेल…

पण आपल्या ‘अनुपस्थितीची’ उणीव नक्कीच जाणवली पाहिजे..!.....!!

शुभ सकाळ





सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला
तरी तो धोकेबाज कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच,,,…!!!
 शुभ सकाळ

सगळ्यांनी साथ सोडली,
तेव्हा माणुसकी कळली,
पावसात गरमा गरम चहा प्यायलो,
तेव्हा आयुष्याची मजा कळली
पैसे नसताना वेगळी किंमत,
पैसे असताना वेगळी किंमत,
तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गम्मत कळली....
 शुभ सकाळ 

सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत......
☆→शुभ प्रभात←☆

सगळी दु:ख दूर झाल्यावर…..
मन प्रसन्न होईल…..
हा भ्रम आहे……
मन प्रसन्न करा…..
सगळी दु:ख दूर होतील…..!
शुभ सकाळ

सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी,
आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी,
जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी,
शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी,
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी,
आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी... ।
 शुभ सकाळ 

सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,
म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून,
हे छोटेसे पत्र पाठवले…
सुप्रभात!

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…..
शुभ प्रभात!

सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा :
आजचा दिवस सुंदर आहे
मी रोज जे काही करतो किंवा
मला वाटते त्या पेक्षा मी
बरेचं जास्त काही करु शकतो
नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार
मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल.
रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात
आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल
जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार
यॆणारॆ दीवस आनंदाने जगणार…...

Marathi Quotes Good Morning

संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.....
शुभ सकाळ 

संधी येत नसते,
आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.
नाव नाही झालं तरी चालेल पण
काम असं करा की लोकांनी आपल नाव काढलं पाहिजे
शुभ सकाळ

संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे
जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला खूप नशिबवान समजा
कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते..
 शुभ सकाळ 




संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच…
जय महाराष्ट्र!
शुभ प्रभात!!

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं… पण
संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!! कारण
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…
समुद्र गाठायचा असेल…,
तर खाचखळगे पार करावेच लागतील…..!!!
“तुमचा दिवस शुभ जावो”

शुभ सकाळ…!!
प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी…
आपण जरी भेटत नसु दररोज,
पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना…
माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…...!!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं” अगदी तुमच्यासारखी…!!

शुभ सकाळ! गुड मॉर्निंग!!
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते..
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण.. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते…
सुप्रभात! आपला दिवस आनंदात जावो…..!

शाळेत असताना ऐकलेली सर्वात “खोटी” गोष्ट..!!
अरे…फक्त 10 वी पर्यंत अभ्यास कर… नंतर काय मज्जाच…!!!
College मध्ये असताना ऐकलेली सर्वात “खोटी” गोष्ट..!!
अरे फक्त १२वी पर्यंत अभ्यास कर… नंतर काय मज्जाच मज्जा. . ….
Sr College University मध्ये ऐकायला येणारी सर्वात खोटी गोष्ट….
अरे फक्त हे चार वर्ष अभ्यास कर …. नंतर जाॅब लागल्यावर मज्जाच मज्जा…..
जाॅब लागल्यावर ऐकू येणारी सर्वात खोटी गोष्ट….
अरे फक्त ४-५ वर्षांचा experience येऊ दे…. मग नंतर काय मज्जाच मज्जा….
Experience आल्यावरची खोटी गोष्ट.
आता काय चांगली पोस्ट मिळूदे मग काय मज्जाच मज्जा
चांगली पोस्ट मिळाल्यावर खोटी गोष्ट
आता काय थोड्याच वर्षानी retirement.... मग काय मज्जाच मज्जा.
Aataa काय मेल्यावर मज्जा करायची काय…. 
म्हणून रोज enjoy करत रहा, आनंदी रहा,
तुम्ही हसा,  दुसऱ्याला हसवा

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…...
आपला दिवस आनंदात जाओ!

शब्द तर अंतरीचे असतात,
दोष माञ जिभेला मिळतो
मन तर स्वतःच असतं
झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं
ठेच तर पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं
असंच नात जपत जगणं,
हेच तर खरं जीवन असतं.
तुमचा दिवस आनंदात जाओ

वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..
कारण वेळ “चांगली” असेल तर,
सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,
“आपले” पण “परके” होतात..
वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…
शुभ सकाळ!


Post a Comment

Previous Post Next Post