Gudi Padwa Wishes in Marathi -नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना द्या अशा शुभेच्छा

गुढीपाडवा शुभेच्छा Gudi Padwa Wishes in Marathi

 हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. गुढीपाडवा म्हणजे नववर्ष आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. गुढी पाडवा हा भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे.गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. पौराणिक कथेनुसार, शालिवाहन नामक एक कुंभाराचा पुत्र होता. शत्रू त्याला खूप त्रास देत असत. मात्र, एकटा असल्यामुळे तो शत्रूशी लढा देण्यास असमर्थ होता. तेव्हा त्याने एक युक्ती केली. शत्रूशी सामना करण्यासाठी त्याने मातीचे सैनिक तयार केले. पाणी शिंपडून त्यांच्यात जीव भरला. शत्रूचे आक्रमण झाले, तेव्हा हेच सैन्य लढले आणि विजयी झाले. तेव्हापासून शालिवाहन शकाचा आरंभ झाला, अशी मान्यता आहे.या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात.नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या दिवसाच्या विशेष प्रकारे शुभेच्छा दिल्या जातात. नातेवाईकांची भेट घेऊ शकत नसलो तरी व्हॉटसअॅप, फेसबुक,शेअर चॅट,ट्विटर, व्हिडीओ कॉल अश्या सोशल साइट्सचा वापर करून शुभेच्छा देणे अधीक शक्य आहे, या माध्यमांद्वारे शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा संदेष.. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.

Gudi Padwa Wishes in Marathi -नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना द्या अशा शुभेच्छा

"गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा"!!


Gudi Padwa Wishes in Marathi



नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. 
 
नवी सकाळ,
नवी उमेद,
नवे संकल्प,
नवा आनंद..
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा!!


शादी से पहले माधुरी दीक्षित का ये राज़ नहीं जानते थे डॉ नेने
और जानें
 
नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..,
सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..,
हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी!!
 
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा,
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी, प्रार्थना!!!
 
चारी दिशांना आनंदाची आहे बहार..,
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..,
दारी सजली आहे रांगोळी..,
आसमंतात आहे पतंगाची रांग..,
नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं!!! 
 
नवंवर्ष नवा हर्ष….,
नवा जोश नवा उत्कर्ष….,
नववर्षाभिनंदन.,
 
दिवस उगवतो दिवस मावळतो,
वर्ष येतं वर्ष जातं,
पण प्रेमाचे बंध कायम रहातात,
आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं, हीच सदिच्छा,,
सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!.
 
जुन्या गोष्टी मागे सोडून,
स्वागत करूया नववर्षाचे,
प्रगतीने आणि उत्साहाने भरलेले असो.
तुमचे नववर्ष हे येणारे!! 
 
पडता दारी पाऊल गुढीचे,
आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे,
या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष
 
आली आहे बहार नाचूया गाऊया..
एकत्र येऊन आनंद साजरा करूया..
निसर्गाची किमया अनुभवूया..
एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया.
 
चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने!! 
 
नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
चांदीचा तांब्या,
कडुनिंबाची पानं,
साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी....
नववर्षाभिनंदन!!. 
 
उभारून गुढी, लावू विजयपताका….
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष 
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा 
 
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणं घेऊन आली सोनेरी दिवस,
आला नववर्षाचा सण घेऊन आला सोनेरी भरारी
नववर्षाभिनंदन.
 
नव्या वर्षात होऊ दे मनाला नव्या विचारांचा स्पर्श,
नवे वर्ष मग आणेल आयुष्यात नवा हर्ष..
नववर्षाभिनंदन.
 
वृक्षांवर सजली आहे नवीन पानांची बहार
हिरवळीने सुंगधित झाली आहे निसर्ग अपरंपार..
चला उभारूया गुढी, आनंदाची आणि समृद्धीची..
 
आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

"नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…..
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"

"सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस....
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"

"उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"

"चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…..
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"

"प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!!!

-आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा"




Post a Comment

Previous Post Next Post